Arya Career Academy

Arya Career Academy

18

9970174996 www.aaryaacademy.com

Arya career Academy, Ahmednagar, India -

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
4

18 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About Arya Career Academy in Arya career Academy, Ahmednagar

कष्ट तेथे यश...

आर्य करियर ऍकॅडमी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त निकाल देणारी संस्था आहे. आजपर्यंत आर्यमधून गेल्या १० वर्षांत ५००० पेक्षा जास्त विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन विविध सरकारी पदांवर नियुक्त झालेले आहेत. सर्वोत्तम प्रशिक्षणाचा दर्जा हेच आमच्या यशाचे गमक आहे. आर्यचे अध्यक्ष श्री. सुनिल फटांगरे हे स्वतः नेव्ही ऑफिसर असुन त्यांनी ठरवून दिलेल्या मार्गाने सर्व विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले जाते. मा. श्री. सुनिल फटांगरे हे स्वतः मेरीटचे विद्यार्थी असून अनेक मल्टीनॅशनल कंपन्यांत काम केल्याचा अनुभव आहे. त्यांनी ठरवून दिलेल्या पद्धतीचे प्रशिक्षण आणि त्यांचे जबरदस्त मार्गदर्शन व शिस्त ह्यामुळेच आर्यचे विद्यार्थी दरवर्षी विविध पोलिस भरत्यांत सर्वप्रथम येतांना दिसतात. आजपर्यंत आर्यने मुंबई, पुणे, ठाणे, नाशिक, अहमदनर ह्यासारख्या अनेक जिल्ह्यांत आपले विद्यार्थी सर्वप्रथम आणून दाखविले आहेत. एकट्या मुबईचा विचार करता आर्यच्या संगमनेर ब्रांचचे सर्वाधिक विद्यार्थी आजपर्यंत मुंबईला भरती झालेले आहे. मुंबई पोलिस भरतीत सर्वात जास्त विद्यार्थी आर्य करियर ऍकॅडमीचेच असतात हे आम्हाला अभिमानाने सांगावेसे वाटते. पुणे, नाशिक, संगमनेर, सटाणा ह्या विविध ठिकाणी आर्यच्या शाखा आज कार्यरत आहेत. अधिक माहितीसाठी आपण ९९७०१७४९९६ ह्या क्रमांकावर संपर्क साधावा
आर्य करियर ऍकॅडमीचे मुंबई पोलीस भरतीत सुयश:
संगमनेरमधील पहिली महिला कंडक्टर, पहिला एअरफोर्स जवान पहिला नेव्ही तसेच संगमनेर तालुक्यातील मुलामुलींचे गेल्या १५ वर्षांपासुन सरकारी नौकरीचे स्वप्न पुर्ण करणारी आर्य करियर ऍकॅडमी १५ व्या वर्षांत पदार्पण करत आहे. हजारो विद्यार्थ्यांच्या सरकारी नौकरीचे स्वप्न पुर्ण करणारी आर्य करियर ऍकॅडमी ही महाराष्ट्रातील सर्वात जास्त निकाल देणारी संस्था म्हणून गणली जात आहे. दरवर्षी होणा-या पोलीस भरत्यांत एव्हड्या जबरदस्त स्पर्धेतही आर्यचे विद्यार्थी पुणे – मुंबईसारख्या शहरांत भरतीत उतरून नेहमीच प्रथम क्रमांक पटकावत आहेत. आर्यने आतापर्यंत भरतीत अनेक रेकॉर्ड केले आहे.
संगमनेरमध्ये १५ वर्षांपूर्वी स्थापना झालेली आर्य ही संस्था संगमनेरातील अनेक प्रतिष्ठित व्यवसायांपैकी एक आहे. संपूर्ण महाराष्ट्रात नावाजलेली ही संस्था पोलीस व आर्मीच्या बाबतीत ’संगमनेर पॅटर्न’ शोधणारी संस्था म्हणुनही ओळखली जात आहे.
कोणत्याही स्पर्धा परिक्षेचा अत्यंत सुक्ष्म अभ्यास करून त्यानुसार योग्य नियोजन करून आर्य दरवर्षी अनेक रेकॉर्ड करत आहे. पोलीस/आर्मीप्रमाणेच एमपीएससी, पीएसआय, सेल्सटॅक्स व सहायक सारख्या परिक्षेतही आर्यने महाराष्ट्रात मेरीटमध्ये विद्यार्थी पास करून दाखवून एक वेगळा ठसा उठविला आहे. तुषार शिंदे मंत्रालय सहायक परिक्षेत अपंगांमध्ये तिसरा तर सुवर्णा राऊन पीएसआय परिक्षेत महाराष्ट्रात १५ तसेच सेल्स टॅक्समध्ये महाराष्ट्रात ३२ वा क्रमांक पटकावणारी कोटकर सारिका तसेच तलाठी ग्रामसेवक आणी आरोग्यसेवक सारख्या परिक्षांतही आर्यच्या विद्यार्थ्यांनी विविध जिल्ह्यात मेरीटमध्ये येण्याचा पराक्रम केला आहे. संगमनेर, पुणे , अकोले, सटाणा, नाशिक सारख्या शहरांत आर्यचा व्यवसाय पसरला आहे.
सर्वोत्तम प्रशिक्षणाचा दर्जा आणी त्यासाठी कोणतीही तडजोड करायची नाही तसेच विद्यार्थ्यांना सर्वोत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील असल्यामुळेच आज आर्यचे नाव संपूर्ण महाराष्ट्रात नावाजले आहे.
सर्वोत्तम शिक्षकवृंद, माफक फी, लायब्ररिपासून सर्व सुविधा तसेच हवेशीर लेक्चर हॉल, विद्यार्थ्यांसाठी २४ तास उपलब्ध वैयक्तीक मैदान, मुलींसाठी सर्व सुविधा, २४ तास विजेची व्यवस्था केवळ मुलाखतीतूनच शिक्षक भरण्याचा नियम ह्या गोष्टींमुळे आर्यमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना सर्वोत्तम प्रशिक्षणच मिळते आणि त्यामुळे आर्यचे विद्यार्थी सर्वोत्तम निकाल देतात.
आर्मीसारख्या सर्वात कमी जागा असलेल्या भरत्यांतही आर्यने आपला ठसा उमटविला असून आजपर्यंत १५ वर्षांता ५००पेक्षा जास्त विद्यार्थी आर्मी व तत्सम भरत्यांत कार्यरत आहेत.
संगमनेर म्हटले की आर्य करियर ऍकॅडमी असे एक सूत्रच तयार झाले आहे संगमनेरमधील अग्रगण्य व नावाजलेल्या व्यवसायांमध्ये आर्यचे नाव येते ही खरोखर आमच्यासाठी अभिमानास्पद गोष्ट आहे.
चांगली शिस्त, प्रत्येक विद्यार्थ्याकडून प्रशिक्षण वैयक्तीक लक्ष देऊन करून घेण्याची जिद्द, विद्यार्थ्यांना मागेल तेव्हा पुरविल्या जाणा-या सुविधा, प्रशिक्षणकाळात भरविले जाणारे ट्रेकिंग कॅम्प, जंगल कॅम्प व पायी सहली ह्या गोष्टींमुळे तसेच ऍकॅडमीतही अनेक कार्यक्रम भरविले जात असल्यामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाबरोबरच त्यांचा व्यक्तिमत्व विकासही चांगल्या प्रकारे होतो.
४५०० स्केफुट स्वतःच्या मालकीची जागा. ६ लेक्चर हॉल, पिण्याच्या पाण्याची सुविधा, वैयक्तीक मैदान तसेच ७ जणांचा स्टाफ ही आर्यची वैशिष्टे आणि ह्याच गोष्टीमुळे आर्यचे वेगळेपण कायम उठून दिसते.
पोलीस भरती म्हटली की आर्य असे जणू ब्रिदवाक्यच आज महाराष्ट्रात प्रत्येकाच्या तोंडातून ऎकू येते. त्यामागील सर्वात महत्वाचे कारण म्हणजे आर्यचा निकाल. १५ वर्षांत आम्ही सातत्याने सर्वोत्तम निकाल देत आहोत त्यामुळेच लोकांचा आमच्यावरील विश्वास अत्यंत दृढ झाला आहे. आम्हाला सांगण्यास अभिमान वाटतो की २०१६ मध्येही आम्ही सर्वोत्तम असेच निकाल दिले आहेत ते खालीलप्रमाणे.
नुकत्याच २०१६ मधील महाराष्ट्र पोलीस भरतीत आर्यच्या विद्यार्थ्यांनी दरवर्षीप्रमाणे पुन्हा एकदा जबरदस्त यश मिळविले आहे. २०१६ च्या पोलीस भरतीत अत्यंत कमी पदे असतांनाही आर्यच्या विद्यार्थ्यांनी तब्बल २००पेक्षा जात पदे पोलीस भरतीत तर तब्बल ७२ पदे आर्मी भरतीत पटकावली तसेच स्टाफ सिलेक्शन भरतीत आर्यच्या ४३ जणांची निवड झाली. आर्यने नुकत्या झालेल्या पोलीस भरतीत राहूल गडाख ह्या विद्यार्थ्याने ठाणे शहर पोलीस भरतीत प्रथम येणाचा पराक्रम केला. आर्यचा सलग ६ व्या वर्षी विद्यार्थी ठाणे शहर पोलीस भरतीत सर्वप्रथम आला आहे. तसेच नाशिक शहर पोलीस भरतीतही सलग ७ व्या वर्षी आर्यचा विद्यार्थी मेरीटमध्ये आला आहे. नाशिक ग्रामीण पोलीस भरतीत तर आर्यच्या छाया गायकर व मीरा दहिभाते ह्या दोघीही प्रथम आल्या नाशिक ग्रामीणमध्ये सलग तिस-या वर्षी आर्यच्या विद्यार्थिनी सर्वप्रथम आल्या आहेत. पुणे शहर पोलीस भरतीत आर्यचा नितिन पानसरे हा व्दितीय क्रमांकाने उत्तीर्ण झाला असून पुणे ग्रामिण पोलीस भरतीत मीना कोळपे ह्या विद्यार्थिनीने मुलींमध्ये सर्वप्रथम येण्याचा पराक्रम केला आहे. तसेच मुंबई रेल्वे पोलीस भरतीत सोनाली सानप व माधुरी कानवडे ह्या विद्यार्थिनींनी मुलींमध्ये लेखीमध्ये अनुक्रमे प्रथम व द्वितीय क्रमांक पटकावला आहे. मुंबई पोलीस भरतीत सचिन पानसरे ह्या विद्यार्थ्याने होमगार्डमध्ये प्रथम क्रमांक पटकावला असून मुतडक तनुजा व भामरे अनिता ह्या दोघी लेखीमध्ये मुलींमध्ये तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाल्या आहेत तसेच सुरेखा चौधरी ह्या विद्यार्थिनीने मुलींमध्ये चौथा क्रमांक पटकावला आहे. मुंबई पोलीस दलात आर्यचे तब्बल ३५ पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एसआरपीएफ - ५ भरतीत आर्यचा सानप रमेश हा द्वितीय तर एसआरपीफ ३ भरतीत आव्हाड लक्ष्मण व रणमुले प्रवीण ह्या विद्यार्थ्यांनी पहिल्या १० मध्ये येण्याचा पराक्रम केला आहे. नाशिक शहर पोलीस भरतीत कविता डावरे ह्या विद्यार्थिनीने १००पैकी ९५ गुण मिळवून मुलींमध्ये लेखीत सर्वप्रथम येण्याचा विक्रम केला. तसेच नाशिक ग्रामिण पोलीस दलातही छाया गायकर हिने १०० पैकी ८८ गुण मिळवून मुलींमध्ये लेखीत तसे सर्व मुलींमध्ये सर्वप्रथम येण्याचा पराक्रम केला आहे. नवी मुंबई पोलीस दलात पुष्पा बर्डे ह्या विद्यार्थिनीने मुलींमध्ये एसटी कॅटॅगरीत प्रथम तर सर्व मुलींमध्ये तृतीय येण्याचा पराक्रम केला आहे. गेल्या १५ वर्षात झालेल्या १२ पोलीस/आर्मी भरत्यांत आर्यने हजारो विद्यार्थ्यांना विविध पदांवर उत्तीर्ण केले आहे. प्रत्येक भरत्यांत आर्यचे विद्यार्थी नेहमीच मेरीटमध्ये सर्वप्रथम राहिले आहे.
मुंबई पोलीस भरतीत आर्यचे जबरदस्त यश 2016 पोलीस भरतीत २००पेक्षा जास्त विद्यार्थी उत्तीर्ण…. मुंबई पोलीस भरतीत तब्बल ३५ पेक्षा जास्त विद्यार्थ्यांची निवड… ७ ठिकाणी आर्यचे विद्यार्थी मेरीटमध्ये टॉपर्स ….. !
१)नितीन परदेशी - १७६
२)भुषण राजपूत - १७६
३)गोपाल राजपूत - १७२
४)गौरव राजपूत
५)दिलीप राजपूत
६)पुनम गिरी- १४७
७)निता जगताप- १५१
८)वाळूंज एकनाथ
९)सानप दिपाली - १५१
१०)अनिता भामरे – १५६(लेखी ८२ तृतीय क्रमांक)
११)दिपाली थोरात - १३९
१२)समाधान दहिफळे – १८२(चौथा क्रमांक)
१३)साजीद मुलानी – १७४
१४)मनोज कोरडे - १८२ (चौथा क्रमांक)
१५)अविनाश बटूळे – १८२(चौथा क्रमांक)
१६)शंकर शिंदे - १७५
१७)मुतडक तनुजा – १४७(लेखी तृतीय क्रमांक)
18)प्रमोद चव्हाण
१९)सुरेखा चौधरी (मुलींमध्ये चौथा क्रमांक)
२०)अक्षदा शिंदे
२१)जाधव कुसूम
२२)सचिन पानसरे (होमगार्ड सर्वप्रथम १७६ गुण)
२३)सुदाम बबन धात्रक(एनटीडी ३रा)
२४)कुंदे सुभाष
२५)किरण आव्हाड
२६)विनोद बापू गोपाळ
२७)तुषार पगार
२८)अतुल चव्हाण
२९)अनिल चौधरी
३०)राजेंद्र चौधरी
३१)अनिता भामरे
३२)मनिषा भामरे
३३)सारिका भामरे
३४)अश्विनी पवार
३५)प्रांजली पाचोरे

आर्यच्या ह्या यशात आर्यचे मॅनेजर दिघे विजय, श्री. होंडे सर, श्री. सुपेकर सर, सौ. पंचफुला फटांगरे मॅडम, क्षिरसागर सर, राहणे मॅडम, पाचपुते सर, मुतडक सर, किरण सर, पुष्पा बर्डे मॅडम,प्रविण वाळूंज सर, ---- वाळूंज सर, तोडकर सर, लोखंडे सर, बिंदू वाकचौरे मॅडम तसेच ईतर सर्व शिक्षकांची मेहनत व जिद्द ह्याचाच सहभाग आहे

Popular Business in ahmednagar By 5ndspot

© 2024 FindSpot. All rights reserved.