SmartBoard

SmartBoard

3

+91 9881496865 wwww.empetustech.com

Wakad, Pune, India - 411057

Is this your Business ? Claim this business

Reviews

Overall Rating
5

3 Reviews

5
0%
4
0%
3
0%
2
0%
1
0%

Write Review

150 / 250 Characters left


Services

Questions & Answers

150 / 250 Characters left


About SmartBoard in Wakad, Pune

Empetus Tech या ई-लर्निंग कंपनीचे
महाराष्ट्र राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या (मराठी माध्यम) अभ्यासक्रमाचे SmartBoard हे देशातील पहिले-वहिले संपूर्ण इंटरॅक्टिव्ह आणि अॅनिमेटेड गेम स्वरूपातील डिजिटल ई-लर्निंग सॉफ्टवेअर/अभ्यासक्रम आहे.

जगातील इतर आंतरराष्ट्रीय कंपन्यांबरोबर काम करत असताना युरोप व अमेरिकेच्या शाळांप्रमाणे आपल्या मराठी मुलांनाही त्यांच्या स्वतःच्या शाळांमध्ये व घरामध्येही प्रोजेक्टर, कॉम्पूटर, लॅपटॉप आणि टॅबच्या सहाय्याने इंटरनेट सहित अथवा इंटरनेट शिवायही ई-लर्निंग स्वरूपात त्यांच्या पुस्तकातील अभ्यासक्रम नाविन्यपूर्ण पद्धतीने शिकता येईल असे एकमेव ई-लर्निंग सॉफ्टवेअर कंपनीने तयार केले आहे.

विस्तृतपणे मांडायचे झाले तर, असे म्हणता येईल कि SmartBoard या सॉफ्टवेअरमध्ये अंदाजे 50000 व त्यापेक्षाही जास्त इंटरॅक्टिव्हिटीज् असणारे पाठ व कविता आम्ही तयार केल्या आहेत. जेणेकरून, मुलांना एखादा पाठ अथवा कविता फिल्मसारखी न बघत बसण्यापेक्षा ते स्वतः त्या इंटरॅक्टिव्हिटीज् मध्ये सहभाग घेतील व त्यांच्या बुद्धीला चालना मिळेल. कंपनीने काही दिवसापूर्वी केलेल्या एका सव्ह्रेमध्ये असे आढळून आले कि या क्षेत्रातल्या बर्याच कंपन्या या फिल्म सारखे ( फक्त पाहू शकू असे) अभ्यासक्रम तयार करून शाळांना देतात व त्याला 'ई-लर्निंग' अभ्यासक्रम असे जाहीरपणे सांगतात. प्रत्यक्षात, 'ई-लर्निंग' हि खूप मोठी आणि विस्तृत संकल्पना आहे जी वेगवेगळ्या इंटरॅक्टिव्ह पद्धतीने विकसित होते. भारतामध्ये या सर्व गोष्टींचा आता कुठे उदय व्हायला लागला आहे.

या सर्व परिस्थितीचा अभ्यास करून व ई-लर्निंग क्षेत्रातील तज्ञ लोकांशी विचारविनिमय करून आपल्या कंपनीने SmartBoard हे एक इंटरॅक्टिव्ह सॉफ्टवेअर बनविले, ज्याचा फायदा शिक्षण क्षेत्रातील प्रत्येकाला, म्हणजेच शिक्षक, मुले, पालक यांना होईल. या सॉफ्टवेअरमध्ये मुले प्रत्येक धडा आवडीने पाहतील आणि त्यामध्ये असणार्या इंटरॅक्टिव्हिटीज् सोडवतील. त्यामुळेच आम्ही या सॉफ्टवेअरला 'मुलांसाठी व शिक्षकांसाठीचे सर्वोत्तम ज्ञान-आधारित व ज्ञान-रचनावादी डिजिटल ई-लर्निंग साधन' असे संबोधतो. कारण, या सॉफ्टवेअरमध्ये मुलांच्या आधी शिक्षकच स्वतः या सर्व पाठ व कवितांचा आवडीने अभ्यास करतील व सर्व इंटरॅक्टिव्हिटीज् आवडीने सोडवतील यात शंका नाही. कारण, अशाच नाविन्यपूर्ण व संपूर्ण इंटरॅक्टिव्ह आणि अॅनिमेटेड गेम स्वरूपात हा ई-लर्निंग अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.

कंपनीने तर "आमच्या SmartBoard सारखा संपूर्ण इंटरॅक्टिव्ह आणि अॅनिमेटेड गेम स्वरूपातील डिजिटल ई-लर्निंग अभ्यासक्रम दाखवा व आमचे एक सॉफ्टवेअर मोफत घेऊन जा." असे आवाहन वजा घोषणाच करून टाकली आहे. हा आत्मविश्वास आम्हाला आमच्या SmartBoard चा दर्जा पाहूनच आला आहे.


कंपनीने पहिल्या टप्प्यामध्ये “माझी शाळा !! डिजिटल शाळा !! (My Digital School Program)" या आमच्या शैक्षणिक उपक्रमाअंतर्गत महाराष्ट्रातील सर्व ७०,००० प्राथमिक शाळांचा व नंतरच्या दुसरया टप्प्यामध्ये १९,००० माध्यमिक शाळांचा चेहरामोहरा बदलण्याचे ध्येय समोर ठेवले आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक शाळा डिजिटल व्हावी व आपल्या मुलांना त्यांच्याच भाषेमध्ये ई-लर्निंगमधून सोप्या पद्धतीने अभ्यास करता यावा हा आमचा सहज उद्देश आहे. ज्या शैक्षणीक सुविधा प्रगतशील देशातील मुलांना मिळतात त्याच सुविधा आपल्या देशातील मुलांना SmartBoard च्या माध्यमातून मिळाव्यात हा आमचा साधा आणि प्रामाणिक प्रयत्न.

तुमच्या प्रतिक्रिया, मार्गदर्शन आणि नवीन कल्पना यांचे कायमच स्वागत आहे, कारण सर्व नाविन्यपूर्ण उपक्रमांसाठी Empetus Tech सदैव सज्ज आहे.

Warm Regards,
Vijay Karkhile
Director | Empetus Tech
Email: vijay@empetustech.com
Ph: +91 0 9881 49 6865 | Skype: vijay_karkhile
Pune, India
www.empetustech.com






Popular Business in pune By 5ndspot

© 2025 FindSpot. All rights reserved.